यंग टीम इंडियाचा झिम्बाब्वेला तडाका

india_vs_zimbabwe

माउंट माउंगानुई (न्यूझीलंड): टीम इंडियाने 19 वर्षाखालील विश्वचषकात आणखी एक मोठा विजय मिळवला. भारताने झिम्बाब्वेचा तब्बल 10 विकेट्स राखून पराभव केला.झिम्बाब्वेनं दिलेलं 155 धावांचं आव्हान भारताच्या सलामीवीरांनीच पार करून टाकलं आणि राहुल द्रविडच्या शिष्यांनी सलग तिसऱ्या मोठ्या विजयाची नोंद केली. त्यामुळे यंग टीम इंडियाची वर्ल्ड कपवरील दावेदारी आणखी भक्कम झाली आहे.

Loading...

प्रथम फलंदाजी करणाऱ्या झिम्बाब्वेला भारताने अवघ्या 154 धावांत गुंडाळलं. हे आव्हान भारताचे नवे सलामीवीर शुभमान गिल नाबाद 90 आणि हार्विक देसाईने नाबाद 56 धावा ठोकून, अवघ्या 21.4 षटकात पूर्ण केलं.या सामन्यात अनुकूल रॉयने 7.1 षटकात अवघ्या 20 धावा देत 4 विकेट्स घेतल्या आणि झिम्बाब्वेला रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भारताने आज नवे सलामीवीर उतरवले. कर्णधार पृथ्वी शॉ आणि मनज्योत कालरा हे मागे थांबले. सलामीसीठा शुभमान गिल आणि हार्विक देसाई आले.हार्विकने 73 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकारासह 56 धावा केल्या. तर शुभमान गिलने 59 चेंडूत 14 चौकार आणि 1 षटकार ठोकत नाबाद 90 धावा कुटल्या.

अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत पूर्ण तयारीनिशी उतरलेल्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया आणि पपुआ न्यू गिनी यांच्याविरुद्धचे सामने जिंकून उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला होता. त्यामुळे झिम्बाब्वेविरुद्धचा सामना भारतासाठी खरं तर औपचारिकताच होती. पण, पृथ्वी शॉच्या संघाने जराही ढिलाई न दाखवता टिच्चून खेळ केला आणि दहा विकेट्सने दणदणीत विजय मिळवला.दरम्यान, भारताने विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. या फेरीत भारताचा सामना बांगलादेशशी होणार आहे.भारताने पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 100 धावांनी पराभव केला होता. त्यानंतर पापुआ न्यू गिनी आणि झिम्बाब्वेवर 10-10 विकेट्स राखून विजय मिळवला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
भिडेंच्या सांगली 'बंद'ला राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ
जेएनयू प्रकरणातील संशयित हल्लेखोरांची ओळख पटली,सत्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ जाणार बेळगावात
राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर पोलिसांच्या ताब्यात