विद्यापीठात संवैधानिक अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य नियुक्त्यांची दुसऱ्यांदा होणार चौकशी!

dr. bamu

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संवैधानिक अधिकाऱ्यांच्या कथित नियमबाह्य नियुक्त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीसाठी माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांच्या अध्यक्षतेखालील समिती मंगळवारी विद्यापीठात येणार आहे. समिती दुसऱ्यांदा चौकशीसाठी येणार असल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

डॉ. वाल्मिक सरवदे यांची नियुक्ती नियमबाह्य असल्याच्या तक्रारी आहेत. या नियुक्त्यांवर दीड वर्षांपासून बोरीकर समितीसमोर विद्यापीठ स्तरावर नेमलेल्या दोन समित्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ‘क्लीन चीट दिली होती. व्यवस्थापन परिषदेने हा चौकशी अहवाल फेटाळल्यानंतर माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीने काही महिन्यांपूर्वी विद्यापीठात येऊन मूळ कागदपत्रांची छाननी केली आहे.

निमसे समिती मंगळवारी तक्रारदारांसमोर व्यवस्थापन कक्षात सकाळी साडेअकरा वाजता सुनावणी घेणार आहे. कुलसचिव सूर्यवंशी यांची मूळ नियुक्ती नियमबाह्य असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या सूर्यवंशी यांच्या आतापर्यंतच्या सेवेतील लाभ वसूल करण्याची मागणीही संघटनांनी केली आहे. या नियुक्त्यांवर निमसे समिती निर्णय देणार आहे. या समितीची फेब्रुवारी महिन्यात नियुक्ती करण्यात आली होती. एका महिन्यात चौकशी अहवाल देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, मागील सात महिन्यांपासून चौकशी रखडली असल्याने तक्रारदारांनी टीका केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या