कोरोनाच्या कृपेने  33 वर्ष परीक्षा देणारे चाचा अखेर झाले मॅट्रीक पास!

exam

तेलंगाना- कोरोना संक्रमण रोखण्यासाठी देशभरात केलेल्या लॉकडाऊननंतर अनेक शैक्षणिक बोर्डांनी आपल्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे. या विद्यार्थ्यांमध्ये एका 51 वर्षे वयाच्या विद्यार्थ्याचाही समावेश आहे.कोरोनामुळे हा विद्यार्थी तब्बल 33 वर्षांनी दहावी उत्तीर्ण झाला आहे.

हैदराबादचे मोहम्मद नुरुद्दीन 51 वर्षांचे आहेत. ते सलग 33 वर्षे दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेस बसत आहेत.पण गेली 33 वर्षांपासून ते सतत अपयशी ठरत आले परंतु त्यांनी कधीही हार मानली नाही. यावेळी त्यांच्या नशिबाने त्यांना साथ दिली आणि अखेर ते पास झाले आहेत.

कोरोना महामारीला रोखण्यासाठी सर्व बोर्डांनी आपले पेपर रद्द केले आणि ज्या विषयांचे पेपर झालेत त्या विषयांच्या मार्कांच्या सरासरीवरून इतर विषयांचे मार्क देण्यात आले. नुरुद्दीन यांचा नेमका इंग्रजीचा पेपर राहिला होता. त्यामुळे इतर विषयांच्या सरासरीवरून त्यांना इंग्रजीचे मार्क्स देण्यात आले आणि ते उत्तीर्ण झाले.

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी सांगितले की, मी 1987 पासून सतत दहावीची परीक्षा देत आहे. मी इंग्रजीत कमकुवत आहे, म्हणून मी त्यात अयशस्वी व्हायचो. पण यावेळेस मी पास झालो कारण कोविड -19 मुळे सरकारने सर्वांना पास केले आहे.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

…तोपर्यंत मी कोरोनाची लस घेणार नाही, राजीव बजाज याचं मोठ विधान

अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निर्णय लांबणीवर; १० ऑगस्ट रोजी होणार सुनावणी