सांगली : मराठा समाजाला ईडब्ल्यूसी देण्याच्या आघाडी सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. यावरून भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि अजित पवारांच्यावर निशाणा साधला आहे. काका-पुतण्यांना गरीब मराठा समाजाचं भलं होऊ द्यायचं नाहीये, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे, अशा शब्दात गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार आणि अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने पवार काका-पुतण्याच्या पोटात कळा उठत आहेत आणि म्हणूनच ते आता इकडे-तिकडे बोंबा मारत फिरतायत’, अशी टीका पडळकरांनी केली आहे. ते आटपाडीच्या झरे इथे बोलत होते. आमदार पडळकर म्हणाले की, ‘मराठा समाजाला पूर्वलक्ष्यी प्रभावाने ews चा लाभ देण्याचा ठाकरे – पवार सरकारमधील निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. मी त्याच वेळेस सांगत होतो की, कायद्यामध्ये पूर्वलक्ष्यी प्रभावाने काही देता येत नाही. आता पुन्हा एकदा सिद्ध झाले की, काका-पुतण्यांना गरीब मराठा समाजाचं भलं होऊ द्यायचं नाही. त्याचप्रमाणे काका पुतण्याचं हे दुखः आहे की, मुळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी कुठल्याही घराणेशाहीला संधी न देता एका साध्या मराठा कुटुंबातील एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली, म्हणून यांच्या पोटात कळा उठतायेत आणि म्हणूनच ते आता इकडे तिकडे बोंबा मारत फिरतायेत.
महत्वाच्या बातम्या :
- Abdul Sattar । लवकरच शिवसेनेचे दहा आमदार शिंदे गटात येणार – अब्दुल सत्तार
- Supriya Sule : सुप्रिया सुळेंच चंद्रकांत पाटलांना खास आमंत्रण; म्हणाल्या,“लवकर घरी जेवायला या, खास बेत करते”
- Abdul Sattar | अर्जुन खोतकर आमच्या सोबत नक्की येणार; अब्दुल सत्तार यांचा मोठा दावा
- Sanjay Raut । थोडक्यात काय तर महाराष्ट्र व मराठी माणूस भिकारडा आहे ?, संजय राऊतांचा राज्यपालांना संतप्त सवाल
- MNS । गुण्यागोविंदाने इथे राहावं, नको त्या गोष्टीत शहाणपणा करु नये; मनसेची राज्यपालांना वार्निंग
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<