धनगर आरक्षणासाठी तुळजापुरात अखंड ज्योत! मल्हार आर्मीचे अनोखे आंदोलन

Dhangar arakshan

तुळजापूर – महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाचा एस टी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी मल्हार आर्मी तर्फे महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी मातेच्या मंदीर ज्योत प्रज्वलन करुन राजे शहाजी महाद्वारसमोर धनगर समाजाचा एस टी मध्ये समाविष्ट करण्यासाठी रणशिंग फुंकण्यात आले.

श्रीतुळजाभवानी दारी धनगर आर्मीने पेटवलेली आरक्षण ज्योत आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन रुपात तेवतच ठेवली जाणार असुन धनगर समाजाला न्याय न दिल्यास धनगर बांधव मंञ्याच्या गाड्या पेटवतील, असा इशारा यावेळी मल्हार आर्मीचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कांबळे यांनी तिर्थक्षेञ तुळजापूरात दिला.

सुरुवातीला श्रीतुळजाभवानी मातेचे महाद्वारमधुन देवीचे दर्शन घेवुन देवीच्या दारी जय भवानी, जय शिवाजी, जय राजमाता आहील्यादेवी होळकर, जय मल्हार यांचा जयजयकार करीत भंडा-याची उधळण करून  धनगर समाजाला एस टी प्रवार्गात आरक्षण मिळालेच पाहिजे या घोषणा देवुन परिसर दणाणून सोडला .

यावेळी कार्यकत्यांना मार्गदर्शन करताना सुरेश कांबळे पुढे म्हणाले, मागील सत्तर वर्षापासून धनगर समाज एस टी प्रवर्गात आरक्षण मिळण्यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहे. परंतु प्रत्येक राजकीय पक्ष समाजाच्या तोंडाला पाने पुसत आहे. या फसवणूक ला यापुढे धनगर समाज बळी पडणार नाही. धनगर समाजाला आरक्षणच्या माध्यमातून न्याय न दिल्यास देवीदारी आंदोलनाची पेटवलेली ज्योत राज्यभर फिरवून आरक्षणासाठी जनजागृती केली जाणार आहे. त्याची सुरुवात आज श्रीतुळजाभवानी दारातुन केल्याचे” त्यांनी सांगितले.

यावेळी सुरेश कांबळे, बाळासाहेब बंडगर, गणपत देवकते, काकासाहेब मारकड समर्थ पैलवान, आण्णा बंडगर, प्रमोद दाणे, वैभव लकडे, प्रशांत गावडे, आदित्य पैलवान, शाहजी हाक्के, चैतन्य बंडगरसह मल्हार आर्मीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या :-