पडेगाव, मिटमिट्यातील अनधिकृत प्लॉटिंग मनपाने हटवली, अनलॉक होताच औरंगाबादेत एजंटांचा सुळसुळाट!

औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिका हद्दीतील मिटमिटा परिसरात अनधिकृत प्लॉटिंग टाकण्यात आली होती. हि प्लॉटिंग मुख्य रस्त्यालगत व आतील भागात करण्यात आली होती. याबाबत प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार मा. अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम यांनी या परिसरातील सर्व प्लॉटची पाहणी करून नगररचना विभागाकडून सविस्तर रेखांकन बाबत माहिती घेतली व कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार शुक्रवारी (दि. ११) जवळपास आठ ते दहा एकरची प्लॉटिंग निष्कासित करण्यात आली आहे.

हि प्लॉटिंग एजंट नियुक्त करून खुलेआम नोटरीच्या आधारे विक्री करत आहे. याबाबत यापूर्वी या भागातील अनधिकृत प्लॉटिंग धारकांविरुद्ध छावणी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तरी देखील हे अनधिकृत प्लॉटींग धारक थांबत नव्हते. त्यांनी या भागात अनधिकृत प्लॉटींग करून विकण्याचा सपाटा लावला होता. सदर अनधिकृत प्लॉटींग आज पूर्णपणे निष्कासित करण्यात आली आहे.

तसेच पहाडसिंगपुरा रोड वर मंडप व्यवसायिक पुंड यांनी नाल्यामध्ये बांधकाम सुरू केले होते ते बंद करण्यात आले आहे. हि कारवाई पदनिर्देशित अधिकारी वसंत भोये, इमारत निरिक्षक सय्यद जमशीद व पोलीस पथक चे कर्मचारी यांनी पार पाडली. अनधिकृतपणे प्लॉटिंगधारका विरुद्ध संबंधित पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करणार आहे अशी माहिती रविंद्र निकम यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP