समर्थ नगरमधील अनधिकृत बांधकाम पाडले, जानेवारीत तक्रार तर ऑक्टोंबरमध्ये कारवाई

समर्थ नगरमधील अनधिकृत बांधकाम पाडले, जानेवारीत तक्रार तर ऑक्टोंबरमध्ये कारवाई

amc

औरंगाबाद :  महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभागामार्फत सोमवारी समर्थ नगर सिल्लेखाना रोड येथील सहजीवन हौसिंग सोसायटी मधील रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे अतिक्रमण काढणे कारवाई करण्यात आली. समर्थ नगर येथील सहजीवन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी येथील रहिवासी यांनी महानगरपालिकेला जानेवारी २१ रोजी अर्ज देऊन कळविले होते की, प्लॉट क्रमांक चार नगर भूमापन क्रमांक वन सेव्हन एट सिक्स थ्री या घरासमोर त्यांच्या गेट लगत यमुनाबाई आश्रुबा शिरसागर आणि संतोष शिरसागर यांनी विनापरवानगी दहा बाय तीस या आकाराच्या जागेत विटा डबर चे बांधकाम करून त्यावर लोखंडी खांब लावून हिरवी जाळी लावून अतिक्रमण केले होते. तक्रारदाराचे गेट पूर्णपणे बंद झाले होते, त्यांना त्यांचे वाहन सुद्धा काढले जात नव्हते.

याबाबत प्रशासक अस्तिक कुमार पांडेय यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम यांनी स्थळ पाहणी करून संबंधितास मार्च महिन्यात सूचना दिल्या होत्या. परंतु अतिक्रमण धारकाने प्रकरण मा. न्यायालयात आहे असे सांगून कागदपत्र दाखल केले होते. याबाबत विधी सल्लागार तथा उपायुक्त अपर्णा थेटे यांचा अभिप्राय घेऊन संबंधितास अतिक्रमण काढणे बाबत नोटीस बजावण्यात आली होती.

तसेच सदर प्रकरण तत्कालीन पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे यांच्या जनता दरबार मध्ये सुनावणी झाली होती. पोलीस निरीक्षक क्रांती चौक यांनी सुद्धा याबाबत पत्रव्यवहार केला होता. सदर अतिक्रमण निष्कासित करण्यात आले तसेच त्याला लागून पोलीस उपअधीक्षक मोटार वाहन कार्यशाळा यांच्या पत्रानुसार वरिष्ठ पोलीस अधिकारी निवासस्थान जवळ जयस्वाल आणि शेख शब्बीर यांनी रस्त्यावर लोखंडी टपरी टाकून अतिक्रमण केले होते. सदर टपऱ्या जेसीबीच्या साह्याने काढण्यात आल्या. तसेच समर्थ नगर ते वरद गणेश मंदिर रोड वर जीरे यांनी गुरुकृपा अपार्टमेंट समोर तीन बाय पाचची लोखंडी टपरी टाकली होती ती काढण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या