fbpx

पनवेल महानगरपालिकेत दारूबंदीच्या प्रस्तावाला एकमताने मंजुरी

panvel drink ban

पनवेल: पनवेल महानगरपालिका हद्दीत दारूबंदी करण्याबाबतच्या प्रस्तावाला पनवेल महानगरपालिकेच्या सभागृहात एकमताने मंजुरी मिळाली आहे. विशेष म्हणजे सत्ताधारयासह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी देखील या प्रस्तावाला पाठींबा दिला आहे.
सत्ताधारी भाजप पक्षाचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पूर्णपणे दारुबंदी करण्यात यावी, असा प्रस्ताव महासभेत ठेवला होता. विरोधी पक्षातील शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या नगरसेवकांनी पाठिंबा देत बिनविरोध हा प्रस्ताव पास करण्यात आला आहे. आता महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे आणि राज्य सरकार यावर काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.