छत्री, मोदी आणि कॉंग्रेस! सोशल मीडियावर मोदींचा स्वावलंबीपणा व्हायरल

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी आपल्या भाषणामुळे, फोटो काढण्याच्या सवयी मुळे आणि त्यांच्या कपड्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. तसेच मोदी समर्थक सुद्धा याच गोष्टीवरून त्यांचे कौतुक करतात. पंतप्रधान मोदी नेहमी आपल्या भाषणात म्हणतात की, मी जनतेचा सेवक आहे. मी प्रधानमंत्री नाही प्रधान सेवक आहे. त्यांच्या भाषण शैलीमुळे अनेक चाहते निर्माण झाले आहे.

अशीच एक पोस्ट आंध्रप्रदेशचे भाजप नेते सुनील देवधर यांनी सोशल मिडीयावर टाकली आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंघ, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचे वेगवेगळे फोटो आहेत आणि त्या फोटोवर ते लिहिले ‘प्रधान सेवक, प्रधानमंत्री और प्रधान परिवार!’.

या फोटोला जर निरखून बघितले असता असे दिसते की त्या चारही फोटो मध्ये एक साम्य आहे ती म्हणजे ‘छत्री’. नरेंद्र मोदी यांनी छत्री स्वतःच्या हातात पडली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंघ, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची छत्री सेवकांच्या हातात आहे. यावर गांधी परिवार आणि कॉंग्रेसवर केलेली हि जहरी टीकाच म्हणवी लागेल. दरम्यान, नुकतीच केंद्रात वर्णी लागलेले केंद्रीय मंत्री डॉ.भागवत कराड यांनी देखील सोशल मीडियावर टाकला आहे. यामध्ये मोदी कसे स्वावलंबी आहेत या पोस्टद्वारे दाखवायचा प्रयत्न भाजप करत आहे का असा प्रश्न समोर येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या