मुंबई : काल दिल्लीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित होते. या बैठकीत शरद पवारांनी संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्षपद भूषवावे यासाठी प्रस्ताव मांडण्यात आला आणि तो मंजूर देखील करण्यात आला आहे.
त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या अनेक चर्चांना उधान आले आहे. आता यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.