जेएनयुचा विद्यार्थी नेता उमर खालीदवर गोळीबार

नवी दिल्ली :  जेएनयुचा विद्यार्थी नेता उमर खालीदवर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज घडलीये. या गोळीबारात उमर खालीद थोडक्यात बचवला. दिल्लीतल्या कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये एका कार्यक्रमात सहभगी होण्यासाठी उमर आला होता. त्यावेळी चहा पीत असताना एक तरूण आला आणि त्याने उमर खालीदवर गोळीबार केला.

या गोळीबारात तो थोडक्यात बचवला. हल्लेखाराचं पिस्तुल खाली पडलं ते पोलीसांनी जप्त केलं. दरम्यान उमर खालिदला पोलीस ठाण्यात नेण्यात आल असून, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

गुन्हेगारांनो गुन्हेगारी सोडा , पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ के व्यंकटेशम यांचा इशारा

मी लाहोरमध्ये पूर्णत: सुरक्षित आहे – उमर अकमल