तुम इतना जो घबरा रहे हो, क्या पाप हैँ जिनको छुपा रहे हो? : उमर खालीदचा मोदींना टोला

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्यातील प्रचाराची शुक्रवारी सांगता झाली. यावेळी भाजप कडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. त्यामुळे ही पत्रकार परिषद लक्षणीय ठरली.

या पत्रकार परिषदेमध्ये भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन बाळगले. त्यामुळे आता मोदी-शहा पत्रकार परिषदेवर मोठ्या प्रमाणात टीका टिपण्णी होताना दिसत आहे. तर आता उमर खालीदने देखील मोदींच्या मूक पत्रकार परिषदेवर टीका केली आहे. तुम इतना जो घबरा रहे हो, क्या पाप हैँ जिनको छुपा रहे हो?, असे ट्विट करत खालीदने मोदींवर निशाणा साधला असून पत्रकार परिषदेची ही कोणती पद्धत आहे. असा खोचक सवाल त्याने विचारला आहे.

Loading...

दरम्यान मोदींनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे टाळले आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेला मोदी उपस्थितीच का राहिले ? अशी चर्चा होत आहे. मोदींच्या या भूमिकेवर राजकीय स्तरातून जोरदार टीका केली जात आहे. तर देशातील अनेक नेत्यांनी मोदींच्या पत्रकार परिषदेची खिल्ली उडवली आहे.

बिचारे पत्रकार प्रश्नांची वाट पाहत बसले आणि ‘शिस्तबद्ध सैनिक’ शांतच बसून राहिले : अखिलेश यादव

पंतप्रधान मोदींचे ऐतिहासिक व धाडसी पत्रकार परिषदेबद्दल अभिनंदन ; जयंत पाटलांचा टोला

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील