मक्केत मंदिर बनू शकत नाही त्याचप्रमाणे अयोध्येत दुसरे कोणते धार्मिक स्थळ उभे राहू शकणार नाही

टीम महाराष्ट्र देशा : अनेक वर्ष प्रलंबित असलेला रामजन्मभूमी वाद सोडवण्यासाठी सर्वोच न्यायालयाने चर्चेसाठी आज मध्यस्थ समिती जाहीर केली.मात्र या जाहीर करण्यात आलेल्या समितीवर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे भाजपच्या केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी आम्ही रामभक्त आहोत तेव्हा रामजन्मभूमीवर अन्य धार्मिक स्थळ उभेच राहू शकणार नाही, असे परखड वक्तव्य केले आहे.

राम मंदिराच्या आंदोलनात उमा भारती सुरवातीपासून सक्रीय आहेत. या संदर्भात बोलताना उमा भारती म्हणाल्या की , न्यायालयाकडून आधीपासूनच असे सांगण्यात आले आहे की, रामजन्मभूमी हा आस्थेचा वाद नसून जमिनीचा वाद आहे. जमिनीचा वाद असल्यास दोन्ही पक्षांमध्ये जर सामंजस्याने एक निर्णय घेतला तर तो न्यायालयास मान्य असतो. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या पद्धतीनुसार काम केले आहे. तसेच व्हेटिकन सिटीमध्ये मस्जिद उभी राहू शकत नाही, मक्का-मदिन्यात मंदिर बनू शकत नाही, त्याच प्रमाणे रामलल्ला जिथे आहेत तिथे दुसरे कोणते धार्मिक स्थळ उभे राहू शकणार नाही. असे देखील त्या म्हणाल्याLoading…
Loading...