तुकाराम मुंडे यांची बदली आता थेट मंत्रालयात

tukaram mundhe

टीम महाराष्ट्र देशा : शिस्तप्रिय आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळख असणारे प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंडे यांची नाशिकच्या आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आली. अवघ्या नऊ महिन्यांतच ही बदली झाल्यानं राजकीय वर्तुळासोबतच सामान्यांतही ही गोष्ट चर्चेचा विषय ठरली. पण, नाशिकच्या आयुक्तपदानंतर मुंडेंची बदली नेमकी कुठे करण्यात आलीय, हे काही स्पष्ट होत नव्हतं. आता मात्र हे स्पष्ट झालंय. तुकाराम मुंडेंची सहसचिव म्हणून मंत्रालयात बदली करण्यात आलीय.

नाशिक मगहानगरपालिकेचा कारभार हाताळणाऱ्या आयुक्त तुकाराम मुंढे यांना शासनाकडून बदलीचं पत्र हाती मिळालंय. ‘शासनानं आपली बदली केली असून आपली नियुक्ती सह सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय मुंबई या रिक्त पदावर केली आहे. तरी आपण आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार जिल्हाधिकारी, नाशिक यांच्याकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारावा’ असा मजकूर या पत्रात दिसतोय.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
मुस्लिमांच्या आग्रहामुळे शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली?
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
तर शिवसेनाही स्वबळावर लढायला तयार; सर्व ११५ जागा लढवणार