तुकाराम मुंडे सकाळी १० च्या ठोक्यालाच कार्यालयात हजर पण इतर अधिकाऱ्यांचा पत्ताच नाही !

टीम महाराष्ट्र देशा: आपल्या प्रामाणिकपणा आणि सचोटीसाठी प्रसिद्ध असलेले आय ए एस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पीएमपीएमएलमधून बदली होऊन ते नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त झाले आहेत. आज ( शुक्रवार ) रोजी ते महापालिकेतील आपल्या दालनात सकाळी १० वाजताच हजर झाले. पण यावेळी बाकीचे अनेक अधिकारी आलेच नसल्याने उपस्थित अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली.

मुंढे आज सकाळी १० च्या ठोक्याला आपल्या दालनात हजर होते. आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे इतर अनेक अधिकारी कचेरीत पोचलेच नव्हते. एरवी आरामात ११ पर्यंत ऑफिसात येणाऱ्या अधिकाऱ्यांना तुकाराम मुंढेंच्या या ‘एन्ट्री’चा सगळ्या ऑफिसने धसका घेतला. सगळ्या ऑफिसमध्ये धावपळ सुरू झाली. अधिकाऱ्यांची पळापळ सुरू झाली. ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली.