कोपर्डी प्रकरणात थेट विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची साक्ष तपासण्याची मागणी

अहमदनगर – संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी खून खटला प्रकरणात आरोपींच्या वकिलांनी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची साक्ष तपासण्याची धक्कादायक मागणी केली आहे.

बचाव पक्षाचे वकील बाळासाहेब खोपडे यांनी कोर्टात साक्षीदारांची यादी सादर केली. या यादीमध्ये उज्ज्वल निकम यांचंही नाव होतं. कोपर्डी सामूहिक बलात्कार आणि खून खटल्यात उज्ज्वल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास झाला असल्याच्या गोष्टीवर बचाव पक्षाने आक्षेप घेतला आहे.

भारतीय न्यायदानाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका सरकारी वकिलांची साक्ष तपासण्याची मागणी करण्यात आली आहे. आता कोर्ट यावर काय निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष लागल आहे.