fbpx

पंढरपूर : उजनी धरण हा पाण्याचा साठा नसून विषाचा साठा आहे : सावंत

टीम महाराष्ट्र देशा- उजनी धरण हा पाण्याचा साठा नसून विषाचा साठा आहे. रसायन मिश्रित पाणी शुद्ध करून घेण्यासाठी शासनाला आदेश देण्याची विनंती शिवसेना नेते तानाजी सावंत यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना केली आहे. दुष्काळी भागातील सर्व विद्यार्थ्यांची सर्व प्रकारची फी माफ करावी अशी देखील मागणी सावंत यांनी केली आहे. फी माफ करण्याच्या मुद्द्यावरून वेळ पडली तर शिवसेना पक्षप्रमुखांनी भाजपचे कान उपटावे अशी मागणी करत सावंत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पंढरपूरच्या दौऱ्यावर आहेत. अयोध्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा महत्वाचा दौरा मानला जात आहे. उद्धव ठाकरे सहकुटुंब पंढरपुरात दाखल झाले आहेत. पंढरपुरात आज होत असलेल्या विराट सभेत शिवसेनेने भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.