पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरावर उडत्या तबकडीच्या घिरट्या ?

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरावर उडती तबकडी घिरट्या घालताना दिसल्याचं वृत्त आहे. 7 जून रोजी पंतप्रधानांच्या दिल्लीतील लोक कल्याण मार्गावरील घरावर उडती तबकडी किंवा त्यासारखी काहीतरी वस्तू दिसली. हिंदुस्थान टाइम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्लीच्या वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पण यासंबंधीची अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. सुरक्षेच्या काराणास्तव त्यांनी माहिती देण्यास नकार दिलाय.

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

7 जून रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर तातडीने नॅशनल सिक्युरिटी गार्ड आणि हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती देण्यात आली. युएफओचा शोध घेण्यासाठी शोधमोहीमही हाती घेण्यात आली होती.

Shivjal