‘बालक पालक’ सिनेमामधील अभिनेत्री झाली उद्योजिका; पोस्ट शेअर करत दिली माहिती

'बालक पालक' सिनेमा

मुंबई : मराठी चित्रपट ‘बालक पालक’ या सिनेमातील अभिनेत्री शाश्वती पिंपळेकरने अभिनय क्षेत्राव्यतिरिक्त काही वेगळे करण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले आहे. नुकतेच शाश्वतीने स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिने ही माहिती आपल्या चाहत्यांंना दिली आहे.

लॉकडाऊन दरम्यान अनेक हातावर पोट असणाऱ्या लोकांवर मोठ संकट ओढावले,लाखो लोक बेरोजगार झाले. परंतु या कोरोनाचा फटका केवळ सामान्य लोकांना नाही, तर मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकरांना देखील  याचा आर्थिक फटका बसला आहे. चित्रीकरण बंद असल्याने कित्येक कलाकरांना काम नाही त्यामुळे कलाकारांना आर्थिक संकटांना तोंड द्यावं लागले. अशीच काहीशी परिस्थिती शाश्वतीची झाली होती.

शाश्वती पिंपळेकरनेही कामाच्या शोधात असल्याची पोस्ट शेअर केली होती. नमस्कार.. माझं नाव शाश्वती पिंपळीकर. मी एक अभिनेत्री असुन चांगला सिनेमा, सिरियल, वेबसीरीज करु इच्छीत आहे. तेव्हा मी करण्या योग्य काम कोणाकडे असेल तर संपर्क साधा..’ अशी पोस्ट शेअर केली होती. मात्र त्यानंतर ही काम मिळत नसल्यामुळे गप्प न राहता तिने स्वतःचा व्यवसाय सुरु करत स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे. शाश्वतीच्या या नव्या उपक्रमाला तिचे फॅन्स आणि मित्रांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

IMP