खा.उदयनराजे भोसलेंनी मराठा मोर्चाचं नेतृत्त्व करावं, मराठा समाजाच्या प्रतिनिधींची पुण्यात मागणी

पुणे : संपूर्ण महाराष्ट्रात आरक्षणासाठी करण्यात येत असलेले आंदोलन मराठा समाजाने शांततेत करण्याचे आवाहन करत आहेत .खासदार उदयनराजे भोसलेंनी मराठा मोर्चाचं नेतृत्त्व करावं अशी मागणी मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी केली आहे. उदयनराजे यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेवून हि मागणी केली आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

खासदार उदयनराजे महाराज व खासदार संभाजी राजे यांनी या आंदोलनाचे नेतृत्त्व करावे, असे आवाहन नुकतेच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, राज्य समन्वयक शांताराम कुंजीर आणि राज्य उपाध्यक्ष अजय भोसले यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले होते . आता उदयनराजे काय भूमिका घेणार यावर बरंच काही अवलंबून असणार आहे.

मराठा आंदोलनकर्त्यांकडे सरकार का गेले नाही? -विखे पाटील

आमदारांचे राजीनामासत्र सुरूच, भारत भालके आणि सीमा हिरे यांनीही दिला राजीनामा

You might also like
Comments
Loading...