fbpx

#पहा_व्हिडीओ: उदयनराजे जेंव्हा गाण म्हणतात, हमे तुमसे प्यार कितना…

टीम महाराष्ट्र देशा – साताऱ्याचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांनी एका पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात भाषणावेळी अचानक गाऊ लागले. त्यांनी “हमे तुमसे प्यार कितना ए हम नही जानते मगर जी नही सकते तुम्हारे बिना” हे गाणं गायलं. उपस्थितांनी टाळ्या आणि शिट्या वाजवून दाद दिली.

धैर्यशील पाटील जर साताऱ्याचे खासदार झाले असते तर त्यांनी सर्वांना न्याय दिला असता, असं उदयनराजे भोसले यावेळी म्हणाले.

सातारा नगरपालिकेच्या वतीनं आयोजित प्रतापसिंह (दादा) महाराज कला क्रीडा, सांस्कृतिक महोत्सव पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.

साताऱ्याचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले नेहमीच त्यांच्या हटके स्टाईलने चर्चेत असतात. कधी कॉलर उडवून तर कधी डायलॉगबाजीने ते आपली झलक दाखवून देत असतात.