सामनाच्या अग्रलेखावरून उदयनराजेंचे शिवसेनेला प्रत्युत्तर, म्हणाले…

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शनिवारी साताऱ्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याच पार्श्वभूमीवर ‘सामना’मधून भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांना शिवसेनेनी भाजपमध्ये आल्यावर स्टाईल मारता येणार नाही असं म्हटले होते.

शिवसेनेच्या या विधानावरून उदयनराजेंनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी मी बेशिस्त नव्हतोच. कुणाचाही स्वभाव एकसारखा नसतो. लोकशाही असल्यानं प्रत्येकाला बोलण्याचा आणि आपापली मतं मांडण्याचा अधिकार आहे असं विधान केले आहे. त्यामुळे शिवसेनेनी केलेल्या टीकेला उदयन राजेंनी फारसे गांभीर्याने घेतलेले नाही असं दिसत आहे.

Loading...

तसेच पुढे बोलताना कॉलर उडवणं हा बेशिस्तपणा आहे का? मग आतापर्यंत भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई झाली नाही ही शिस्त म्हणावी का? असा प्रतिप्रश्न त्यांनी शिवसेनेला केला. प्रत्येकाची स्टाइल ही स्टाइल असते. मी जनतेशी बांधिल आहे आणि शेवटपर्यंत राहील असंही उदयनराजेंनी म्हटले आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी ‘सामना मध्ये लिहलेला अग्रलेख हा शुद्ध मराठीत लिहंलेला आहे. त्यामध्ये कुठेही उदयनराजेंचा अपमान करण्यात आलेला नाही. उदयनराजे हे आपला माणूस आहे. त्यामुळे आपल्या माणसाकडून काही अपेक्षा ठेवण्यात गैर काय? असं विधान केले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
'...यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच'
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी