उदयनराजेंनी तातडीने घेतली शरद पवारांची भेट, पक्षांतराच्या निर्णयावर चर्चा ?

टीम महाराष्ट्र देशा : भाजप प्रवेशाच्या तयारीत असणाऱ्या राष्ट्रवादी नेते आणि सातारचे खा. उदयनराजे भोसले यांनी तातडीने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पावर यांची पुण्यात भेट घेतली आहे. पुण्यातील शरद पवार यांच्या निवासस्थानी धनंजय मुंडे, शरद पवार आणि उदयनराजे भोसले यांच्यात चर्चा सुरु आहे. तर सोबत शशिकांत शिंदे देखील आहेत.

उदयनराजे भोसले हे भाजपात जाणार अशा जोरदार चर्चा असतानाच ही भेट होत आहे. त्यामुळे या भेटीमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हेले काही दिवस उदयनराजे भोसले भाजपात प्रवेश करणार असल्याचे चर्चा आहे. त्या संदर्भात अनेकदा राजे यांनी भाजप नेत्यांच्या गाठीभेटी देखील घेतल्या आहेत. त्यामुळे उदयनराजे यांना रोखण्यासाठीच शरद पवार आणि धनंजय मुंडे प्रयत्न करत असल्याच दिसत आहे.

दरम्यान उदयनराजे भोसले यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी मंगळवारी बैठक झाली. यावेळी उदयनराजे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली. यामध्ये उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा झाली असल्याची माहिती आहे. अद्यापही त्यांच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब होऊ शकलेलं नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा उदयनराजेंसोबत चर्चा केली.