जो वंचित म्हणेल तो बुझदिल; जय भीम फेस्टिव्हलमध्ये उदयनराजे कडाडले

prakash ambedkar comment on udayanraje bhosale

टीम महाराष्ट्र देशा : साताऱ्यामध्ये जय भीम फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते झाले. उद्घाटनाच्यावेळी बोलताना उदयनराजेंनी वंचित बहुजन आघाडीवर टीका केली.

यावेळी बोलताना ‘निवडणुकीच्या काळात वंचित आघाडी निर्माण झाली. मला प्रश्न पडला वंचितचा नेमका अर्थ काय? आणि का वंचित? या लोकशाहीत प्रत्येकजण समान आहे. कोणी कोणाला वंचित ठेवत नसतं, सर्वजण समान आहेत. केवळ राजकारणासाठी प्रत्येकजण त्याचा दुरुपयोग करत असतात. जे लोक म्हणतात आम्ही वंचित आहोत, माझ्या हिशेबाने ते लोक फार बुझदिल आहे असं मी समजतो’, असं उदनयराजे म्हणाले.

दरम्यान, दलित मते आकर्षित करण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमबरोबर आघाडी करत वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली होती याचा सरळसरळ फटका कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता आहे.