‘जो तुम्हारे दिल मे है, वो मेरे दिल मे नहीं’ : उदयनराजे

टीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना कॉलर च्या मुद्द्यावरून चिमटा काढला होता त्यानंतर उदयनराजे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई भेटीचे छायाचित्र सर्वत्र पोहचले. या दोन्ही घटनांची महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली . या चर्चेतून कोणी काय अर्थ काढायचा तो काढा पण जो तुम्हारे दिल मे है, वो मेरे दिल मे नहीं…मुख्यमंत्र्यांची भेट ही केवळ राजधानी महोत्सवाचे निमंत्रण देण्यासाठी होती..अशी फेसबुक पोस्ट आज (गुरुवार) खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.

आजपर्यंत खासदार उदयन राजे आणि अजित पवार यांच्या फारकतीची वेळ आली तरी शरद पवार कधीच मध्ये पडले नाहीत. उदयनराजेंवरुन निर्माण होणाऱ्या सर्व प्रश्नांना पवारांनी आतापर्यंत शांतपणे उत्तरं दिले आहे. मात्र काल पहिल्यांदाच त्यांनी उदयनराजेंच्या स्टाईलवरुन चांगलेच टोले मारले. ‘आपल्यासमोर सर्वांच्या कॉलर खाली असतात’ अस म्हणत पवारांनी राजे स्टाईलवर शाब्दिक फटकारे मारले.

त्यानंतर अवघ्या काही तासांतच उदयनराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांच्या हल्ल्यानंतर या भेटीला विशेष राजकीय महत्व प्राप्त झालं होतं. राजधानी महोत्सव सातारा 2018 या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी यासाठी निमंत्रण देण्यासाठी उदयनराजे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असली तरी या दोन नेत्यांमध्ये बऱ्याच वेळ चर्चा झाली . या चर्चेचा तपशील समोर आला नसला तरी शरद पवार यांच्या मिश्कील टिपण्णी नंतर राज्याच्या राजकारणात ही सर्वात मोठी घडामोड मानली जात होती मात्र मुख्यमंत्र्यांची भेट ही केवळ राजधानी महोत्सवाचे निमंत्रण देण्यासाठी होती असं भोसले यांनी स्पष्ट केलं आहे.

You might also like
Comments
Loading...