भाजपच्या मंचावर मोदींसोबत उदयनराजे, छत्रपतींची पगडी भेट देऊन केले स्वागत

टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा आज नाशिक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत समारोप होते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी विधनसभा निवडणुकीच्या तोंडावर आज काय घोषणा करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या लक्षवेधी सभेला भाजपमध्ये नुकतेच दाकःल झालेले सातारचे माजी खा. उदयनराजे भोसले देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. यावेळी उदयनराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छत्रपतींची पगडी भेट देत स्वागत केले. तसेच यावेळी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आदी मान्यवर उपस्थित आहेत.

दरम्यान राष्ट्रवादीत असलेले उदयनराजे भोसले यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्ली दरबारी जाऊन देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत उदयनराजे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एक मोठा नेता भाजपच्या गळाला लागल्याने भाजपची ताकद पश्चिम महाराष्ट्रातही वाढली आहे.