उदयनराजेंचा भाजपला पहिला दणका, भाजप अध्यक्षाच्या मेळाव्याला मारली दांडी

टीम महाराष्ट्र देशा : भाजपात नुकतेच दाखल झालेले उदयनराजे भोसले यांनी पक्षाला एक सरप्राईज दिले आहे. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत पश्चिम महाराष्ट्र पक्ष मेळावाल्या गैरहजेरी लावून उदयनराजे भोसले यांनी भाजपला पहिला दणका दिला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र या महत्वपूर्ण मेळाव्याला उदयनराजे यांनी दांडी मारली आहे.

विधानसभेचे बिगुल आता वाजले आहे. त्यामुळे भाजप पक्षाने जोरदार तयारी केली आहे. आज पुणे येथे जे. पी, नड्डा यांच्या उपस्थितीत पश्चिम महाराष्ट्र पक्ष मेळावा होत आहे. या मेळाव्याला पश्चिम महाराष्ट्रातील सर्व भाजप नेते उपस्थितीत आहेत. तसेच नव्याने भाजपात दाखल झालेले हर्षवर्धन पाटील, रणजित मोहिते पाटील आणि धनंजय महाडीक हे नेतेही मेळाव्याला हजर आहेत. मात्र उदयनराजे भोसले यांनी मात्र आपल्या कार्यशैली प्रमाणे पक्ष मेळाव्याला गैरहजेरी लावली आहे.

दरम्यान उदयनराजे भोसले हे आपल्या हटके स्टाईल आणि बेधडकपणासाठी ओळखले जातात. राष्ट्रवादीत असताना त्यांनी अनेकवेळा पक्षनेतृत्वावरच जाहीररीत्या तोफ डागली होती. तसंच अनेकवेळा त्यांनी पक्षशिस्तीचा भंग केल्याचाही आरोप त्यांच्यावर झाला. अशातच भाजपचे कार्यकारी अध्यक्ष घेत असलेल्या मेळाव्यालाच ते गैरहजर राहिले आहेत. त्यामुळे उदयनराजेंचा पहिला दणका भाजपला मिळाला असल्याचं दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या