आणि खासदार उदयनराजे ढसा ढसा रडू लागले; व्हिडिओ

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले रविंद्र धनावडे यांचे पार्थिव त्यांच्या गावी मोहाट येथे आले तेव्हा संपूर्ण वातावरण शोकाकुल झाले होते. संपूर्ण जावळी तालुका गहिवरून गेला होता. शहीद धनावडे यांच्या पार्थिवाचे दर्शन घेताना अवघ्या १२ वर्षाची श्रद्धा धाय मोकलून रडत होती. कुटुंबासह संपूर्ण गावच मोठ मोठ्याने हंबरडा फोडत होता.

यावेळी उपस्थित असणाऱ्या उदयनराजेंना श्रद्धा चा हंबरडा पहावत नव्हता. कुटुंबाचा आक्रोश पाहून उदयनराजेही गहिरून गेले. अखेर त्यांचा संयम संपला आणि अश्रूचा बांध तुटला. श्रद्धाला जवळ घेऊन ताई तू रडू नको मी आहे काळजी करू नको असे म्हणताना उदयनराजे ढसा ढसा रडू लागले.

You might also like
Comments
Loading...