ठाकरे सरकारचा पुन्हा धक्का, फडणवीसांच्या ‘या’ निकटवर्तीयाची नियुक्ती रद्द

blank

टीम महाराष्ट्र देशा : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय संजय उपाध्याय यांची नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.या निर्णयामुळे फडवणीस यांना धक्के देण्याची मालिका सुरुच असल्याचे दिसत आहे. उपाध्यय हे महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण विकास महामंडळ उपाध्यक्षपदावर कार्यरत होते. आता त्यांची ही नियुक्ती रद्द करण्यात आली आहे.

उपाध्याय हे मुंबईतील भाजपाचे मोठे नेते असून देवेंद्र फडवणीस आणि दिल्लीतील अनेक भाजपा नेत्यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री असताना उपाध्याय यांची ‘म्हाडा’वर नियुक्ती करण्यात आली होती. तसंच त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जाही दिला होता. मात्र आता ठाकरे सरकारने त्यांनी नियुक्ती रद्द केली आहे.

यापूर्वी ठाकरे सरकारने फडणवीसांच्या काळातील अनेक निर्णय रद्द किंवा स्थगित केले आहेत. आरे कारशेड, थेट सरपंच निवड, हायपरलूप, बुलेट ट्रेन, पालिका क्षेत्रातील कामांना स्थगिती अशा अनेक निर्णय स्थगित किंवा रद्द केले आहेत.