आधी डल्ला मारला आणि आता हल्लाबोल करत आहेत – उद्धव ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा: ”आधी डल्ला मारला आणि आता हल्लाबोल करत आहेत,” अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चावर टीका केली आहे.पैठणमध्ये शरद सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्घाटन कार्यक्रम झाला. त्यावेळेस ते बोलत होते.

आम्ही एकटेच लढणार आणि जिंकणार, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्वबळावर लढणार असल्याचं सांगितलं. शिवाय 2019 नंतर भाजप सत्तेत राहणार नाही, तुम्ही देश सांभाळा आणि आम्ही राज्य सांभाळतो, असं म्हणत आतापर्यंत भाजपसोबत होतो. मात्र देशही यांच्या हातात आणि आता घरात घुसले आहेत. घरात घुसल्यानंतर काय करावं लागतं, हे तुम्हाला माहित आहे.अस सांगत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा एकला चलो रे चा नारा दिला.Loading…
Loading...