मुंबई : शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकारी बंडखोर आमदारांनी वेगळा गट स्थापन केला. पक्षातील या मोठ्या बंडखोरीमुळे उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. यानंतर दोनच दिवसांनी एकनाथ शिंदे गटाने भाजपशी हात मिळवून राज्यात सरकार स्थापन केले. या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. दरम्यान शिवसेनेतील अनेक मोठ्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडली आणि शिंदे गटात प्रवेश केला. ही बंडखोरी झाली असली तरी शिंदे गटाकडून वारंवार तेच शिवसेनेचे नेते आहेत आणि त्यांचाच गट म्हणजे खरी शिवसेना असा दावा केला गेला आहे.
यानंतर नव्याने मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांनी थेट शिवसेनेच्या धनुष्यबाण आपला दावा ठोकला आहे. त्यामुळे आता हे सर्व प्रकरण निवडणूक आयोगाकडे पोहचले आहे. अनेक तज्ञांच्या मते पाहिलं तर शिवसेनेतील जास्तीत जास्त नेत्यांची संख्या एकनाथ शिंदे यांच्या बाजूने असल्याने शिवसेनेच्या धनुष्यबाणावर ते आपली पकड मिळवू शकतात. मात्र दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे वारंवार सांगत आहेत की, शिवसेनेला कोणीही धक्का लावू शकत नाही. धनुष्यबाण हा आमच्याकडेच राहील. दोन्ही गटांकडून आपापल्या परीने दावे ठोकले जात आहेत. मात्र आता या सर्व प्रकरणात निवडणूक आयोगाची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
निवडणूक आयोगाने या वादावरुन एकनाथ शिंदे आणि शिवसेनेला आदेश दिले आहेत. त्या आदेशानुसार, या दोन्ही गटांना कागदोपत्री पुरावे सादर करायला सांगितले आहेत.
निवडणूक आयोगाने हे कागदपत्र सादर करण्यासाठी दोन्ही गटांना ८ ऑग्स्टपर्यंतची मुदत दिली आहे. या दोन्ही गटांना ८ ऑग्स्टला दुपारी १ पर्यंत हे पुरावे सादर करायचे आहे. त्यामुळे आता या दोन्ही गटाच्या आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे राज्याच्या राजकारणाचं लक्ष लागून असणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- mahesh tapase | काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फोडण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत – महेश तपासे
- 68th National Film Award । ६८ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर; ‘तान्हाजी’ला मिळाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान
- Naresh Mhaske : “आम्ही संयम राखलेला आहे, आमच्या संयमाचा कुठेतरी…”; नरेश म्हस्के यांचा आदित्य ठाकरेंना इशारा
- Viral Video | एकनाथ खडसे समर्थकाला भर चौकात दोन महिलांनी दिला चोप
- Ranveer singh | रणवीर सिंगने केले चक्क न्यूड फोटोशूट; नेटकऱ्यांच्या मजेदार कॉमेंट्स आणि मिम्स
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<