मुंबई : शिवसेनेत मोठा बंड झाल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रथमच सर्वांसमोर येऊन भावना व्यक्त केली. शिवसेनेचे खासदार व प्रवक्ते तसेच सामना वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपसह एकनाथ शिंदे व बंडखोर आमदारांवर वारंवार निशाणा साधला. त्यांनी मुलाखतीत दरम्यान बोलताना शिवसेनेतून बाहेर गेलेल्या आमदारांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. या मुलाखतीत बोलताना त्यांनी सरकार असताना विश्वासदर्शक ठरावाला सामोरे न जाण्याचेही कारण स्पष्ट केले आहे. माझ्या एकाही माणसाने सभागृहात माझ्याविरोधात मत व्यक्त केले असते तर ते माझ्यासाठी लज्जास्पद ठरले असते, असे मत उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले.
मुलाखत सुरू असताना संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना विचारले की, तुम्ही विश्वास दर्शक ठरावाला सामोरे गेला असतात तर फुटीर गट उघड पडला असता. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, तो पडलाच ना, अध्यक्षांच्या निवडणुकीत पडला, त्यानंतरही पडला आणि पडतच चालला आहे. निवडणूक आयोगाला जे पत्र दिलं आहे त्यातही शिस्तभंगाच्या कारवाईचा उल्लेख आहे. मी नेहमी म्हणतो की, हल्ली लोकशाहीमध्ये डोकं वापरण्यापेक्षा ते मोजण्यासाठीच जास्त उपयोग होत आहे”.असेही ठाकरे यावेळी म्हणाले.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारवरही निशाणा साधला. सध्याचे सरकार आहे ‘हम दो एक कमरेमे बंद हो जाये’ असच आहे. जेव्हा वरून चावीने उघडतील तेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. मला भासवल जात होत की, आपल्याला काँग्रेस कडून धोका आहे. शरद पवारांची तशी ओळखही आहे असेच ते सांगत होते. मात्र आपल्याच लोकांनी दगा दिला. शेवटच्या काळातही मी विश्वासघातक्यांना तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे का? विचारलं होतं. काँग्रेस, राष्ट्रवादीशी मी बोलतो, भाजपासोबत जायचं आहे तर मला भाजपाकडून दोन तीन प्रश्नांची उत्तरं मिळू द्या. आपण काँग्रेस, राष्ट्रवादीला जाऊन सांगू की, माझे लोक तुमच्यासोबत आनंदाने राहण्यास तयार नाहीत. पण त्यांच्याकडे तेव्हढी हिम्मत नाही. ते रोज काही तरी नवीन कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. बाकी काही नाही. अश्या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली.
याआधी काल पहिल्या भागात मुलाखतीमध्ये बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले होते कि, सरकार गेले, मुख्यमंत्रीपद गेले याची खंत नाही, पण माझीच माणसे दगाबाज निघाली. मी रुग्णालयात शस्त्रक्रियेनंतर गुंगीत असताना सरकार पाडण्याचे प्रयत्न झाले. शस्त्रक्रियेनंतर एकदा मानेखालील शरीराची हालचाल बंद पडली होती, तेव्हा काहीजण मी बरा होऊ नये म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते. आता तेच लोक पक्ष बुडवायला निघाले आहेत. माझ्या शरीराची हालचाल होत नव्हती तेव्हा सत्तांतरासाठी हालचाली सुरु होत्या, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray : नितीन गडकरी यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा आधार घेत उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
- Narayan Rane | उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा छळ केला, त्यांना त्रास दिला- नारायण राणे
- Jayant Patil | “…म्हणून उद्धव ठाकरे त्यांचे अचानक नावडते झाले”; जयंत पाटलांची बंडखोरांवर टीका
- Narayan Rane : “आदित्य ठाकरेंना शेंबूड पुसता येतो का?, कुणाला काहीही गद्दार म्हणता”; नारायण राणेंची सडकून टीका
- Ashish Shelar | उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचं अस्तित्व भाजपमुळेच – आशिष शेलार
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<