fbpx

वडीलानंतर मुंडे साहेबांनीच जवळ केल; गोपीनाथ गडावर छत्रपती उदयनराजे गहिवरले

udyanraje bhosle at gopinathgad

गोपीनाथगड : केवळ माझ्यासाठी नाहीतर सर्वासाठी गोपीनाथ मुंडे हे आदर्श होते, ते खऱ्या अर्थाने लोकराजे होते, माझ्या वडिलांनंतर मुंडे साहेबांनीच जवळ केल्याच म्हणत खासदार उदयनराजे भोसले यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे, दरम्यान, आठवणींना उजाळा देताना यावेळी उदयनराजेंना गहिवरून आल्याच पहायला मिळाल. .

लोकनेता गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त परळीयेथील गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच खासदार उदयनराजे भोसले, खासदार संभाजीराजे भोसले, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह अनेक खासदार आमदार उपस्थित होते. या कार्यक्रमाला दोन्ही छत्रपती एकाच मंचावर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.

यावेळी बोलताना उदयनराजे म्हणाले कि, एकदा नाशिकला असताना मला गोपीनाथ मुंडे यांचा फोन आला, फोनवर त्यांनी मला मुंबईला येण्यास सांगितले. त्यावेळी मी एवढ तातडीने का बोलवताय असे विचारले त्यावर तुम्हाला मंत्रीपदाची शपथ घेयची असल्याच मुंडेसाहेबांनी सांगितले. यावरूनच ते माझ्यावर किती प्रेम करत होते हे दिसत.  वडीलानंतर मुंडे साहेबांनीच जवळ केल. मी आज छत्रपती या नात्याने नाही तर त्यांचा मुलगा म्हणून कार्यक्रमाला आलो असल्याचही यावेळी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सांगितले.