राज्यात सध्या सर्वत्र अस्वस्थता; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई :  सरकारवर टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाना साधला आहे.राज्यात सध्या सर्वत्रच अस्वस्थता असून, सरकार कोणत्याही वर्गाचे अथवा समाजाचे समाधान करू शकत नसल्याची भावना आहे. अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते गणेशोत्सवानिमित्त गणेश मंडळांना सरकारच्या जाचक नियमामुळे येत असलेल्या अडचणीबाबत झालेल्या मेळाव्यात बोलत होते.

ते पुढे बोलताना म्हणाला की, आरक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या मराठा, धनगर व लिंगायत समाजाला सरकारने काहीच दिले नाही. सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग हे सरकार देऊ शकत नाही मराठा, धनगर व लिंगायत समाजाला आरक्षण देऊ शकत नाही. एवढेच काय पण, हिंदूंच्या सणांसाठी सुरक्षित कायदे व नियम पण देऊ शकत नाही. हिंदूंच्या सणासाठी जो उठतो तो न्यायालयात जातो अन सरकार गप्प राहते, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

मशिदीवरचे भोंगे बंद होत नाहीत, मग हिंदूच्या सणांना आडकाठी का?

bagdure

विधान परिषदेला भाजपशी युती तरीही उद्धव ठाकरे म्हणतात, निवडणुका स्वबळावरच लढणार

You might also like
Comments
Loading...