जनतेसाठी स्वयंपाक करायलाही तयार, पण पाणी पवारांच्या धरणातील नको : उद्धव ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा : जनतेसाठी स्वयंपाक करायला देखील तयार आहे. पण पाणी पवारांच्या धरणातील नको, असे म्हणत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला आहे. काही दिवसांपूर्वी पवार यांनी शिवसेनेच्या जाहीरनाम्यावर टीका केली होती. तुम्हाला राज्य करायला सांगतोय की स्वयंपाक करायला सांगतोय हाच प्रश्न पडलाय? असा टोला पवारांनी लगावला होता. यावर उद्धव ठाकरे यांनी खरमरीत प्रत्युत्तर दिले आहे. बार्शी येथील आजच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना चांगलेचं लक्ष्य केले.

शरद पवार आता स्वयंपाक करायला मतं देयचं का असा सवाल विचारत आहेत. पण मी त्यांना सांगू इच्छितो जनतेसाठी स्वयंपाक करायला देखील तयार आहे. पण पाणी तुमच्या धरणातील नको. इतके दिवस खाऊन तुमची पोट भरली आता जनतेची वेळ आली तेव्हा खड्यासारखेमध्ये येतायं, असे ठाकरे म्हणाले.

शिवसेनेने आपल्या जाहीरनाम्यातून १० रुपयांत चांगलं सकस जेवण राज्यातील जनतेला उपलब्ध करून देणार असल्याचं आश्वासन दिले आहे. मात्र शिवसेनेने दिलेले हे आश्वासन अवास्तव असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. यावर पवारांनी चांगलाचं समाचार घेतला होता. दहा रुपयांत जेवण राज्यात कुठे आणि किती ठिकाणी देणार? तुम्हाला राज्य करायला सांगतोय की स्वयंपाक करायला सांगतोय हाच प्रश्न पडलाय? अन्नधान्याचा प्रश्न आहे पण त्यासोबतच इतर प्रश्न देखील राज्यात आहेत.” अशी टीका पवारांनी केली होती.

महत्वाच्या बातम्या