भाजपने ‘गरज सरो वैद्य मरो’ अशी परिस्थिती निर्माण केल्यानेच श्रीनिवासला उमेदवारी – उद्धव ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा : जर श्रीनिवासला भाजपाने उमेदवारी दिली असती तर मी भाजपाचा प्रचार करायला आलो असतो मात्र भाजपा ने ‘गरज सरो वैद्य मरो’ अशी परिस्थिती निर्माण केल्यानेच शिवसेनेने श्रीनिवासला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला हाणला आहे. मोखाड्यामध्ये शिवसेनेने घेतलेल्या प्रचार सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या धोरणांवर कडाडून हल्ला केला.

ज्या पक्षासाठी चिंतामण वणगा यांनी यातना सहन केल्या, पक्ष वाढवला तो पक्ष वणगा ना विसरला तर पक्षात प्रवेश पाहिजे असल्यास थैली दाखवा पक्षात प्रवेश देतो असा प्रवत्तीचा हा पक्ष असून माझी थैली मात्र ही जीवाभावाची माणसे आहेत असे ही ते म्हणाले. कॉग्रेस मधून भाजपामध्ये आलेल्या गावितांना विधानसभेची उमेदवारी दीड वर्षा पुर्वीच घोषित होते तर मग श्रीनिवासची लोकसभेची उमेदवारी घोषित करायला उशिर का केला? असा प्रश्न देखील ठाकरे यांनी उपस्थित केला.

त्याचप्रमाणे भाजपाचा विजय झाला तर चिंतामण वणगांना आंनद होईल तर मग श्रीनिवास चा पराभव झाला तर वणगांना आनंद होईल का ? अशा खालच्या पातळीवर जावुन भाजपा नेते प्रचार करत असल्याचा आरोप उध्दव ठाकरे यांनी केला.