शरद पवार MCA साठी भेटतात मात्र शेतकरी आत्महत्या, कर्जमाफीसाठी नाही

udhav thackeray kolhapur

कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्र्यांना MCA निवडणुकीची चर्चा करण्यासाठी भेटतात. मात्र शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफीसाठी नाही असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल सहयाद्री बंगल्यावर झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या भेटीवर टिका केली आहे. उद्धव ठाकरे हे सध्या तीन दिवसीय पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी कोल्हापूरमधील शिनोळीत शिवपुतळ्याचे अनावरण केल्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते. तसेच कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ देणार नाही. तर सरकारमध्ये राहून प्रश्न सुटू शकत नसतील तर सतेला लाथ मारू असेही ते म्हणाले आहेत.

Loading...

पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारकडून केल्या जाणाऱ्या जाहिरातीवरही टिका करत
पंतप्रधानांनी त्याच्या जाहिरातीसाठी 1100 कोटी खर्च केले मात्र एवढा खर्च कशासाठी ? असा सवाल त्यांनी केला आहे. एका बाजूला विजय मल्ल्याला पळायला संधी दिली जाते मात्र शेतकऱ्याला वेगळा न्याय दिला जातो. काही चूक झाल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात असल्याची टिकाही त्यांनी केली आहे.Loading…


Loading…

Loading...