राष्ट्रवादी म्हणजे शेण खाणाऱ्यांची अवलाद, त्यांनी छावण्या, शेणातही भ्रष्टाचार केला – ठाकरे

udhav thackeray

टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी कॉंगेसचे अध्यक्ष शरद पवार यांना निवडणूक जवळ आल्यावर दुष्काळ आठवत आहे, परंतु महाराष्ट्रात दुष्काळाच्या वेळी शिवसैनिक शेतकऱ्यांना मदत करत होता. शेतकऱ्यांच्या अनेक मुलींची लग्न शिवसैनिकांनी लावून दिली, तेव्हा शरद पवार कुठे होते. अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. परभणीमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराचे जुने पुस्तक सभेत दाखवत तोफ डागली आहे. म्हणाले की, कॉंग्रेस – राष्ट्रवादीचे नेते जाहिरातीमधून लाज कशी वाटत नाही हे विचारतात, पण आधी हे तुमच्या भ्रष्टाचाराचे पुस्तक वाचा आणि तुम्हीच सांगा लाज वाटते का, काँग्रेस-राष्ट्रवादीने गुरांच्या छावण्या आणि त्यांच्या शेणातही भ्रष्टाचार केला. त्यामुळे शेण खाणारी राष्ट्रवादीसारखी औलाद नको, असा घणाघात ठाकरे यांनी केला आहे.