‘ कोणी काहीही म्हणो हे सरकार पडणार नाही याची शाश्वती मी घेतो’

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार कुठल्याही क्षणी कोसळू शकते. फार नाही तर येत्या ११ दिवसांत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील हे सरकार कोसळेल, असे भाकित महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांनी केले आहे. राणे यांच्या या टीकेला मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तितकेच सडेतोड उत्तर दिले आहे.

दरम्यान, राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झाले आणि अवघ्या १३ व्या मिनिटात तहकुबही करण्यात आले. त्यानंतर महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असेपर्यंत सभागृहात रोज सर्व आमदारांनी उपस्थित राहायला हवे. तसेच ‘ सरकारला अडचण निर्माण होईल,’ असे वक्तव्य कुणीही करू नये. कोणी काहीही म्हणो हे सरकार पडणारी नाही याची शाश्वती मी घेतो, असे ठाकरे यांनी या वेळी पुन्हा स्पष्ट केले.

Loading...

मुख्यमंत्र्यांनी सोनिया गांधींचे या बैठकीत कौतुक केले. सोनिया गांधी चांगल्या विचारांच्या आहेत, असे त्यांनी आवर्जून सांगितले. सरकारला अडचण निर्माण होईल असे कुणीही वक्तव्य करू नये, अशी तंबीही त्यांनी दिली. मागील सरकारच्या काळात घोषणांचा पाऊस होता. अंमलबजावणीचा मात्र दुष्काळ होता. आपलं सरकार तस नाही.जे बोलतो ते आपण करतो. त्याच ताजं उदाहरण शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

दरम्यान, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देखील महाविकास आघाडीच्या बैठकीत सर्व आमदारांना विधानसभेत हजर रहा, चर्चेत सहभागी व्हा, आपले प्रश्न मांडा, जनतेचे प्रश्न सोडवा, लोकांना महाविकासआघाडीकडून हीच अपेक्षा असल्याचे सांगितले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
#मरकज : मशीद खाली करण्यास मौलानांनी दिला नकार,  अजित डोवालांना उतरावं लागल मैदानात
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका