पाऊस पडो ना पडो शिवसेनेवर मतांचा पाऊस होयला हवा – उद्धव ठाकरे

udhav thakrey

टीम महाराष्ट्र देशा: पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई, कोकण आणि नाशिक येथील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणुक शिवसेनेकडून प्रतिष्टेची करण्यात येत आहे. त्यामुळेच मतदानाच्या दिवशी पाऊस पाऊस पडो ना पडो मतांचा पाऊस पडलाच पाहिजे असा आदेशच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे.

Loading...

२५ जून रोजी होणाऱ्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भवन येथे लोकाधिकार समिती महासंघाच्या कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. मागील ५२ वर्षाच्या काळामध्ये लोकाधिकार महासंघ हा शिवसेनेचा पाठकणा राहिला आहे. अनेक आंदोलने आणि निवडणुकांत समितीने महत्वाची भूमिका बजावली असल्याचही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...