मतपत्रिका वापरून निवडणुका घ्या – उद्धव ठाकरे

मुंबई: भाजपच्या विजयानंतर अनेक पक्षांकडून ईव्हीएम मशीनबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे निवडणुका बॅलेट पेपरवर घेऊन भाजपने सर्वांच्या मनातला संशय काढून टाकण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. कर्नाटक निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

केंद्र आणि देशभरातील बहुतांश राज्यांमध्ये सत्ता असणाऱ्या भाजपने कर्नाटक निवडणुकीमध्ये देखील दणदणीत यश संपादन केले आहे. २२४ पैकी जवळपास ११० – ११२ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी होताना दिसत आहेत. दरम्यान, भाजपच्या विजयानंतर पुन्हा एकदा इव्हीएम मशीनबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. दरम्यान, कर्नाटकमधील जनतेने भाजपला कौल दिला आहे, जनमताचा सन्मान करत त्याचे स्वागत करायला हव असल्याच उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

प्रत्येक निवडणुकांचे निकाल वेगवेगळे लागत असतात. कर्नाटकमध्ये भाजपने चांगले यश मिळवले आहे, कर्नाटक निवडणुकीचा परिणाम महाराष्ट्रात होणार नाही, त्यामुळे पालघरची निवडणूक आम्हीच जिंकू असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या

जाणून घ्या दक्षिणेत भाजपला अच्छे दिन दाखवणाऱ्या येडियुरप्पांचा जीवन प्रवास

 

Karnataka Election : सिद्धरामय्या बदामीमधून विजयी तर चामुंडेश्वरीतून पराभूत Loading…
Loading...