fbpx

मी इतरांच्या मुलांचेही हट्ट पुरवतो, त्यांचा धुणीभांडयासाठी वापर करत नाही, उद्धव ठाकरेंचा पवारांना टोला

udhav thackeray

मुंबई: मी माझ्या मुलासह इतरांच्या मुलांचाही लाड करतो, इतरांची मुल केवळ धुणीभांडी करायला वापरण हा माझ्या पक्षाचा विचार नाही, म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. मंगळवारी शरद पवार यांनी सुजय विखे पाटील यांच्याबद्दल बोलताना, माझ्या घरातील मुलाचा हट्ट मी पुरवू शकतो, पण इतरांच्या मुलाचा हट्ट मी का पुरवावा? असा सवाल केला होता.

भाजप प्रवेशानंतर सुजय विखे पाटील यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकर यांची भेट घेतली आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो तर शरद पवार जे बोलतात त्याच्या उलट करतात. पवार हे अष्टपैलू नेते आहेत, पण ज्योतिषी कधी झाले हे माहित नाही, अस उद्धव ठाकर म्हणाले.

दरम्यान, शिवसेना उमेदवारांची यादी तयार झाली असून येत्या एक दोन दिवसांत जाहीर केली जाईल, जालन्या संदर्भात दोन्ही नेते माझ्याकडे येतील आम्ही चर्चा करू मात्र युतीमध्ये मिठाचा खडा पडणार नसल्याचा विश्वास ठाकर यांनी व्यक्त केला आहे.

3 Comments

Click here to post a comment