सामान्यांचा किती खिसा कापणार; सामनामधून सरकारला सवाल

टीम महाराष्ट्र देशा: ‘सरकारचा कारभार जनतेच्या पैशावर चालतो हे खरे असले तरी सामान्य माणसाच्या पैशांवर किती हात मारायचा याची मर्यादा राज्यकर्त्यांनी पाळायची असते. या मर्यादांच्या चौकटीतच सरकारने आपल्या उत्पन्नाचे स्रोत वाढवायचे असतात. हल्ली मात्र जमेल तेथून, मिळेल तेवढे सरकारचे उत्पन्न वाढविण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे की काय’, म्हणत सामना संपादकीय मधून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे.

अशीच एक बातमी बँकेतील ठेवीसंदर्भात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार बँकेत ठेवलेल्या ठेवीचे पैसे मुदतीनंतर परत मागणाऱ्या ठेवीदाराच्या हातात बँक कदाचित अर्धीच रक्कम ठेवू शकते. हे चित्र सरसकट सर्वच बँकांमध्ये दिसेल असे नाही, पण बुडणाऱ्या किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल झालेल्या बँकांमध्ये दिसू शकते. बुडणाऱ्या बँकेला त्या बँकेच्या ठेवीदारांनीही हातभार लावावा असा एक हेतू या धोरणामागे असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र हा ‘आजार एकाला आणि शस्त्रक्रिया दुसऱ्याचीच’ अशातला प्रकार म्हणावा लागेल. म्हणत उद्धव ठाकरे यांनी सरकारला सवाल केला आहे.