थापा मारून राज्य आणायचे यालाच ‘चाणक्य’नीती म्हणायचे का ?

amit shaha vr udhav thakare

टीम महाराष्ट्र देशा: दोन दिवसांपूर्वी पुण्यामध्ये बोलत असतांना भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चाणक्य नितीन सरकारक चालवत असल्याचं विधान केल होत, विरोधकांकडून शहा यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला जात असतानाच आता मित्रपक्ष शिवसेनेकडून देखील निशाना साधण्यात आला आहे. लोकांना थापा मारून पुनः पुन्हा राज्य आणायचे यालाच चाणक्य नीती म्हणायचे का असा सवाल ‘सामना’मधून विचारण्यात आला आहे.

भाजप नेत्यांकडून रामराज्याची भाषा केली जाते, पण हे रामराज्य कसे असेल याचा खुलासा आता झाला आहे. उत्तर प्रदेशसह संपूर्ण देशात बलात्कार, महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. यावर तोडगा काढायचे सोडून बलात्काराच्या घटना रोखणे प्रभू रामचंद्रांनाही शक्य नसल्याचे उत्तर प्रदेशातील भाजपचे आमदार सुरेंद्र नारायण सिंह यांनी तसे उघडपणे सांगितले आहे. उत्तर प्रदेशात बलात्काराच्या ज्या घटना घडल्या आहेत त्यात भाजपचे आमदार आरोपी आहेत. त्यामुळेच बलात्कार रोखणे प्रभू श्रीरामासही शक्य नाही असे राज्यकर्त्यांना वाटत असावे काय? असा सवाल देखील शिवसेनेकडून विचारण्यात आला आहे.

बलात्कार रोखणे रामप्रभूंना शक्य नाही याचा दुसरा अर्थ असा होतो की, ढासळलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर आमचे नियंत्रण नाही. रावणाने सीतामाईस पळवून नेले तेथे प्रभू श्रीराम काही करू शकले नाहीत. तेव्हा ते या कलियुगात काय करणार? आजही अनेक सीतामाईंवर रोजच अत्याचार करणारे रावण आहेत. त्या रावणांना ज्यांनी रोखायचे ते राज्यकर्ते काखा वर करून फिरत आहेत. पंतप्रधान मोदी हे ‘अच्छे दिन’ आणतील असा वायदा होता, पण महागाईपासून काळ्या पैशांपर्यंत एकही वादा पूर्ण झाला नसल्याचं सामनामधून सांगण्यात आलं आहे.