पंचांग फाडून टाकण्याचेच आदेश निघायचे बाकी; उद्धव ठाकरेंची फटाके बंदीवरून टीका

udhav thackeray latest 1

टीम महाराष्ट्र देशा: आता केवळ पंचांग फाडून टाका आणि सणांचे थोतांड बंद करा, असे आदेश निघायचे बाकी राहिल्याची संतप्त प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. आपल्याकडील सणांची रया गेली आहेच. शांततेचा अतिरेक झाला तर एक दिवस असंतोषाचा स्फोट होईल, अशा इशारा देखील उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. ते मुंबईत बोलत होते. सध्या फटाके बंदीच्या विषयावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. त्यातच आता उद्धव ठाकरे यांनी देखील आक्रमक होत बंदीला विरोध केला आहे.

Loading...

राज्यात फटाके बंदीवरून चांगलेच राजकीय बॉम्ब फुटताना दिसत आहेत. त्यातच मुंबई हायकोर्टानेही निवासी भागात फटाके विक्रीचे परवाने रद्द करण्याचा आदेश दिला होता. यानंतर आता राज्यात दिवाळीमध्ये फटाके फुटणार कि नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 Loading…


Loading…

Loading...