fbpx

योग्य वेळी सर्व गोष्टी कळतील, भुजबळांच्या प्रवेशावर उद्धव ठाकरेंचे सूचक वक्तव्य

उद्धव ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रावादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि खा. सुनील तटकरे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भुजबळ – तटकरेंच्या प्रवेशबद्दल विचारल असता योग्य वेळी सर्व गोष्टी कळतील, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.

कॉंग्रेसच्या निमर्ला गावित आणि राष्ट्रवादी काँगेसच्या रश्मी बागल यांनी आज मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला, गावित आणि बागल यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवबंधन बांधले आहे. यावेळी बोलताना चांगले लोक पक्षात येत आहेत, त्यामुळे पक्षाची ताकद वाढत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

राज यांच्या चौकशीतून काही निघणार नाही, उध्वव ठाकरेंनी केली भावाची पाठराखण

कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली आहे. गुरुवारी २२ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी त्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर राज यांच्या चौकशीतून काही निघणार नाही, असा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे अडचणीच्या प्रसंगी उद्धव ठाकरे भावाची पाठराखण करताना दिसत आहेत.

छगन भुजबळ, सुनील तटकरे शिवसेनेच्या वाटेवर

माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंगेसचे नेते अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय असणारे खा. सुनील तटकरे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं वृत्त प्रसिद्ध झाले आहे. सुनील तटकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्याचं बोलल जात आहे. तसेच माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे देखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या