हे सरकार ‘आपलं सरकार’ नाही – उद्धव ठाकरे

कोल्हापूर: कोल्हापूरमधील नेसरी येथे झालेल्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे . उद्धव ठाकरे हे तीन दिवसीय पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत त्यावेळी नेसरी येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

या सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. सत्तेत असताना जनतेला न्याय मिळत नसले तर सत्तेचा काय उपयोग असा सवालच ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. त्याचबरोबर कर्नाटक सरकार जे करतय त्याला लोकशाही कसे म्हणायचं ? संपूर्ण सत्ता दिल्यास ‘कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र’ देखील महाराष्ट्रात आणणार तर लवकरात लवकर बेळगाव महाराष्ट्रात आणणार असं वक्तव्य सुद्धा उद्धव ठाकरेंनी या जाहीर सभेत केलं आहे.

राज्य सरकारच्या एकूण कारभारावर आणि ‘मी लाभार्थी’वरून उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारचा चांगलाच समाचार घेतला उद्धव ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्रीपद हे माझ्ये ध्येय नाही, जाहीरातीवर खर्च करण्यापेक्षा सिंचनावर खर्च करा, जाहीरात करण्याची गरज पडणार नाही तर हे सरकार ‘आपलं सरकार’ नाहीच असं सुद्धा उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...