महाराष्ट्राची राख आणि गुजरातची रांगोळी सहन करणार नाही – उद्धव ठाकरे

udhav thackeray latest 1

नवी मुंबई: बुलेट ट्रेन, औष्णिक उद्योगांच्या माध्यमातून महाराष्ट्राची राख आणि गुजरातची रांगोळी होणार असून शिवसेना नेहमीच याला विरोध करणार आहे. भावी काळात कोंकणच्या विकासासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन कार्य करण्याची गरज असल्याची मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. कोंकणातील युवा उद्योजकांसाठी जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी कोंकण भूमी प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेने ६ व्या जागतिक कोंकण महोत्सवाचे वाशी एक्झीबिशन सेंटर येथे आयोजन केले आहे. यावेळी कोकण क्षेत्रातील तरूणांना उद्योग मार्गदर्शन करून त्यांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यासाठी विशेष योगदान देणाऱ्या सचिनदादा धर्माधिकारी यांचा नवउद्योग निर्माण गौरव हा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

कोणताही व्यवसाय सुरु करण्यासाठी त्याची योग्य माहिती, त्याचे योग्य व्यवस्थापन व बारकावे शोधणे गरजेचे असल्याचे मत धर्माधिकारी यांनी व्यक्त करत उत्तम समाज घडण्यासाठी मनुष्याकडे वैचारिक धन व अभ्यासू वृत्ती अंगी बाणवावी असे त्यांनी सांगितले आगामी काळात कोकणातील पर्यटन व उद्योगाच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या वतीने विशेष संस्था स्थापन करण्यात येणार असून त्याच्या माध्यमातून येथील व्यवसायाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी यावेळी दिली.या जागतिक कोकण महोत्सवात कोंकणातील पर्यटन , उद्योग , शेती व येथील उत्पादनाची माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोकणातील आधुनिक उद्योग व शेती क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या उद्योजक व शेतकऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.