उद्धव ठाकरेंची काल मोदींची भेट आज आयोध्या दौऱ्याची तारीख जाहीर…

मुंबई : मागील अनेक दिवसांपासून रखडलेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख अखेर निश्चित झाली आहे. येत्या सात मार्च रोजी मुख्यमंत्री अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. महाराष्ट्र सरकारच्या 100 दिवसपूर्तीला उद्धव ठाकरे अयोध्येत जाऊन श्रीरामाचं दर्शन घेणार होते, पण उद्धव ठाकरे आता सात मार्चला अयोध्येला जाणार आहेत, अशी माहिती राऊत यांनी दिली आहे.

तसेच उद्धव ठाकरेंचा अयोध्येचा संपूर्ण कार्यक्रम ठरला असून तिथे ते रामल्लाचं दर्शन करतील आणि शरयूची तीरावर आरती करणार आहेत. या कार्यक्रमाठी हजारो शिवसैनिक देशभरातून येणार असल्याचं संजय राऊतांनी यावेळी सांगितलं.

Loading...

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी दिल्लीमध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याला समर्थन देखील केलं आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची देखील भेट होती. त्यामुळे शिवसेना पुन्हा आपल्या जुन्या मित्राच्या जवळ येत आहे का ? असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

तर, राज्यात भाजपबरोबर नातं तोडून शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर घरोबा केला आणि आज जरी आडवाणी सत्तापदावर नसले, तरी ते भाजपचे शीर्ष नेते आहेत, महत्त्वाचे नेते आहेत. त्यामुळे भाजपबरोबरचा जो पूल आता मोडलेला आहे, तो पुन्हा रिपेअर करता येईल का, त्याद्वारे येण्याजाण्याची वाट चालू राहिल का, या दृष्टीनं चाचपणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात आता नक्की कोणता नवीन ट्विस्ट पाहायला मिळतो याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

“काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राममंदिराच्या निकालाचं स्वागत केलं होतं. त्यामुळे सल्ले देणाऱ्यांनी आधी माहिती घ्यावी आणि नंतर बोलावं,” असं उत्तर संजय राऊतांनी विचारलेल्या प्रश्नाला देताना म्हणाले.

गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला मोठं यश मिळालं होतं. महाराष्ट्रातील 48 जागांपैकी भाजपने 23 तर शिवसेनेने 18 जागा जिंकल्या. त्यानंतर उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर गेले होते. 15 जून 2019 रोजी उद्धव यांचा अयोध्या दौरा पार पडला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
#मरकज : मशीद खाली करण्यास मौलानांनी दिला नकार,  अजित डोवालांना उतरावं लागल मैदानात