आगामी निवडणुकीत शिवसेनेला सोबत घेऊन लढण्याचे सुधीर मुनगंटीवारांचे संकेत

सुधीर मुनगंटीवार

टीम महाराष्ट्र देशा: गेल्या तीन वर्षापासून भाजप आणि शिवसेनेचे रुसवे फुगवे सुरूच आहेत आता तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढणार असं जाहीर केलंय. मात्र, २०१९ आणि २०२० चा अर्थसंकल्प भाजप आणि शिवसेनेचाच अर्थमंत्री वाचेल असा विश्वास राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलाय. हे सांगताना त्यांनी शिवसेनाही भाजपसोबतच असणार असे स्पष्ट संकेतही दिलेत.

गेल्या तीन वर्षांपासून शिवसेनेचे भाजपसोबत रुसवे फुगवे सुरू आहेत. अशावेळी शिवसेना भाजपसोबत राहणार हे मुनगंटीवार ठामपणं सांगितलंय. शिवाय आगामी विधानसभाही भाजपच जिंकणार असंही ते म्हणालेत. त्यामुळे युती तुटण्याचे आसर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खोडून काढलेत